गुरुदेव भक्तांशी कर्मचाऱ्याची अरेरावी; गुरुदेव सेवा मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

राष्ट्रसंतांच्या मानवतेच्या विचारांना हरताळ? भाविकांशी उद्धट वर्तन, समज देणाऱ्या पत्रकाराचाही अपमान केल्याचा आरोप

 अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो गुरुदेव भक्त श्रद्धेने श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमात दाखल झाले आहेत. राष्ट्रसंतांच्या मानवता, सेवा, नम्रता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांचा जागर करण्यासाठी आयोजित या महोत्सवात मात्र गुरुदेव सेवा मंडळाच्या एका कर्मचाऱ्याच्या कथित उद्धट वर्तनाने संस्थेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अमोल बांबल या कर्मचाऱ्याने अनेक गुरुदेव भक्तांशी अरेरावीची वागणूक केल्याचा आरोप असून, त्याला समज देणाऱ्या पत्रकाराचाही अपमान केल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझल मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीला गझलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पांचाळे यांच्या प्रत्येक गझलेला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती. एकीकडे सुरेल गझल मैफलीत रसिक तल्लीन झाले असताना, दुसरीकडे आश्रमातील एका कर्मचाऱ्याच्या वर्तनामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप पुढे आला.

अमोल बांबल या कर्मचाऱ्याकडून गुरुदेव भक्तांशी उद्धटपणे बोलणे, अरेरावी करणे आणि शिवीगाळ करण्याचा प्रकार घडत असल्याचे पाहून एका पत्रकाराने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. गुरुदेव भक्तांशी अशा पद्धतीने वागू नका, शिवीगाळ करू नका, आपल्या वर्तनामुळे गुरुदेव सेवा मंडळासारख्या संस्थेची प्रतिमा बदनाम होऊ शकते, असे पत्रकाराने स्पष्टपणे सांगितले. मात्र, चूक सुधारण्याऐवजी संबंधित कर्मचाऱ्याने पत्रकाराचाही अपमान केल्याचा आरोप आहे.

राष्ट्रसंतांचे नाव मोठे, पण कर्मचाऱ्यांच्या वर्तनात मानवता कुठे?

ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर मानवता, सेवाभाव, बंधुता आणि माणसामाणसातील प्रेमाचा संदेश दिला, त्यांच्याच पुण्यतिथी महोत्सवात श्रद्धेने आलेल्या भाविकांना अपमानास्पद वागणूक मिळत असेल, तर हा गंभीर विरोधाभास आहे. गुरुदेव भक्तांच्या श्रद्धेवर उभ्या असलेल्या संस्थेत कर्मचाऱ्यांकडून नम्रता आणि सेवाभावाची अपेक्षा असताना अरेरावीचे प्रकार घडत असतील, तर संस्थेच्या व्यवस्थापनाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

गुरुदेव सेवा मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनाची चौकशी करावी. भाविकांचा सन्मान राखणे ही संस्थेची जबाबदारी आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांचा केवळ व्यासपीठावरून जयघोष करून चालणार नाही, तर त्या विचारांचे आचरण संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वर्तनातूनही दिसले पाहिजे. अन्यथा राष्ट्रसंतांच्या नावाने होणाऱ्या भव्य आयोजनांचा आणि प्रत्यक्षातील वागणुकीचा विरोधाभास लोकांसमोर येत राहील.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

लाडली बहना योजना में महिलाओं को मिलेंगे 40 हजार रुपये? वायरल लिंक का सच आया सामने!

महाराष्ट्र की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना का लाभ लेने वाली महिलाओं के लिए एक अहम खबर सामने आई है। पिछले कुछ दिनों से सोशल मीडिया पर दावा किया जा…

ST NCMC Card : अब लंबी कतारों से मिलेगी राहत, ऑनलाइन बुक करें प्राथमिकता स्लॉट

एसटी बसों से सफर करने वाले यात्रियों के लिए राहत भरी खबर है। महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम (MSRTC) ने नेशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बनवाने की प्रक्रिया को आसान…