अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढू लागल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तसेच जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
भाजपचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तसेच माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. भानुदास बेरड यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शामराव पिंपळे, संतोष म्हस्के, रमेश पिंपळे, युवराज पोटे, विद्या शिंदे, गायताई माने, अर्चना चौधरी, बाळासाहेब पोटघन, डॉ. अजित फुंदे, सुनील म्हस्के, हर्षवर्धन धामणे, सोपान कुलांगे, संदीप परभाणे, गणेश भालसिंग, हनुमान बंड, आकाश ढाकणे, पाराजी माने, सुयोग धामणे, सुनील उमाप, राम पानमळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


