कालव्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा ३६ तासांनंतर मृतदेह आढळला; परिसरात हळहळ

अशोकनगरजवळ कॅनॉलच्या पाण्यात आढळला मृतदेह; रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढले

तिवसा , राज माहोरे, (प्रतिनिधी) : तिवसा तालुक्यातील आनंदवाडी जवळील कालव्यात वाहून गेलेल्या ५३ वर्षीय शेतकऱ्याचा तब्बल ३६ तासांनंतर मृतदेह आढळून आला. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगरजवळ कॅनॉलच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळला. रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

दिवाकर सुखदेव माहुरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतातून परतल्यानंतर मातीने भरलेले पाय धुण्यासाठी ते आनंदवाडी जवळील कालव्यावर गेले होते. यावेळी अचानक पाय घसरल्याने ते पाण्यात पडून वाहून गेले. त्यांनी आरडाओरडा केल्याने तेथून शाळेत जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच तिवसा तहसीलदार, पोलीस स्टेशन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. बुधवारी सकाळपासून घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरापर्यंत शोध घेण्यात आला; मात्र त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर सायंकाळी अशोकनगरजवळ कॅनॉलच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मनोहारी मैत्र संघातर्फे मातृभूमी सेवा पुरस्कारांचे वितरण

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : संस्कृती ही समर्पणावर उभी असते. सत्यनिष्ठा आणि सत्याची पूजा हे संस्कृतीचे भूषण आहे. संस्कृतीला सत्याचा आधार नसेल तर ती निरर्थक ठरते. मराठी संस्कृती केवळ सत्यावरच…

परोपकार, सद्वर्तन और ज्ञानातूनच जीवनकल्याण : ह.भ.प. बा.ल. चोथवे महाराज

नांदेड (प्रतिनिधी) :  पापापासून दूर राहणे, पुण्यकर्म करणे आणि निर्मळ वृत्तीच्या सज्जनांची संगत ठेवणे, हीच जीवनकल्याणाची त्रिसूत्री आहे. केवळ धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा प्रवचन श्रवण करून जीवनात परिवर्तन घडत नाही,…