संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

सकाळी निःशुल्क थॅलेसेमिया तपासणी शिबिर; सायंकाळी भजन संध्या

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत कंवरराम धाम ट्रस्ट, अमरावती आणि तोलानी चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी निःशुल्क थॅलेसेमिया तपासणी शिबिर, तर सायंकाळी भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे.

सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बाबा हरदासराम सिंधू नगर धर्मशाळेत थॅलेसेमिया मायनर तपासणी शिबिर होणार आहे. मुंबई येथील डॉ. नरेश तोलानी व त्यांची वैद्यकीय चमू तपासणी करणार आहे. सिंधी, शीख, लोहाणा आणि मेमन समाजातील युवक-युवतींसह पाच वर्षांवरील मुला-मुलींनी या शिबिरात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन संत कंवरराम साहिब यांचे चतुर्थ ज्योत गद्दीनशीन संत साई राजेशलाल साहिब ‘कंवर’ यांनी केले आहे.

शिबिराचे उद्घाटन पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. ए. टी. देशमुख यांच्या हस्ते होणार असून, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी अध्यक्षस्थानी राहतील. डॉ. नरेश तोलानी, डॉ. सिकंदर आडवाणी, डॉ. दीपा घुंडियाल, संतोषकुमार सबलानी, डॉ. सी. के. दारा आणि विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे महासचिव पी. टी. दारा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संस्थेचे सचिव नानक आहुजा यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, रविवारी सायंकाळी ७.३० वाजता सिंधू नगर मैदानावर भजन संध्या होणार आहे. राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद आणि संत कंवरराम धाम ट्रस्ट यांच्या वतीने संत साई राजेशलाल साहिब ‘कंवर’ यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम होईल. भोपाळ येथील प्रसिद्ध राम-श्याम म्युझिकल पार्टी भजनांची प्रस्तुती करणार आहे. यावेळी संत कंवरराम साहिब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पुष्पांजली अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात येईल. पल्लव कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण होणार आहे. सिंधू नगर बॉईज ग्रुप आणि संत कंवरराम सेवा मंडळाचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभणार आहे.

दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून संत कंवरराम साहिब यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासोबतच समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या कार्यक्रमांना समाजबांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संत कंवरराम धाम ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना लाखो भाविकांची साश्रुनयनांनी मौन श्रद्धांजली

श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम,राज माहोरे (प्रतिनिधी) : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित मौन श्रद्धांजली कार्यक्रमात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या…

सहकारमहर्षी पद्मश्री श्यामरावजी कदम यांच्या नावाने उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण व्हावे!

डॉ. हंसराज वैद्य समाजाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाच्या विकासाला नवी दिशा देतात. कृषी, सहकार, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पद्मश्री सहकारमहर्षी श्यामरावजी कदम हे अशाच…