अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात ९१.०८ टक्के मतदान

पाच जिल्ह्यांतील ८१ केंद्रांवर शांततेत मतदान; २७ ऑक्टोबरला मतमोजणी

अमरावती | राज माहोरे प्रतिनिधी

अमरावती. विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यांत शुक्रवारी, दि. २३ ऑक्टोबर रोजी शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण ३५ हजार ८१० मतदारांपैकी ३२ हजार ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची अंदाजित टक्केवारी ९१.०८ टक्के असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.
सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली होती. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ८१ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. सर्व केंद्रांवर मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्हानिहाय मतदानाच्या आकडेवारीनुसार, वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक ९२.८७ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यात ९२.१७ टक्के, अकोला जिल्ह्यात ९२.१२ टक्के, बुलढाणा जिल्ह्यात ९०.७५ टक्के आणि अमरावती जिल्ह्यात ८९.३६ टक्के मतदानाची नोंद झाली.
निवडणूक निरीक्षक अभय महाजन आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी सकाळी अमरावती शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी अपर आयुक्त संजय जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्रांवरील व्यवस्थेची माहिती घेत विभागीय आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली होती. विभागीय आयुक्त आणि निवडणूक निरीक्षक यांनी मतदान संपेपर्यंत या माध्यमातून प्रक्रियेवर लक्ष ठेवले. तसेच संबंधित जिल्हाधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही आपापल्या जिल्ह्यांतील मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.

जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

– अमरावती : १०,०९७ पैकी ९,०२३ मतदारांनी मतदान केले.
– अकोला : ५,९४२ पैकी ५,४७४ मतदारांनी मतदान केले.
– बुलढाणा : ९,१२४ पैकी ८,२८० मतदारांनी मतदान केले.
– वाशिम : ३,७१५ पैकी ३,४५० मतदारांनी मतदान केले.
– यवतमाळ : ६,९३२ पैकी ६,३८९ मतदारांनी मतदान केले.

२७ ऑक्टोबरला मतमोजणी
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या सुरक्षितपणे स्ट्राँग रूममध्ये जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील लोकशाही भवन येथे होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…