कोल्हापुरातील पूरस्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

महामार्गासाठी पिलर पूल उभारण्याची मागणी

कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमागे नदी क्षेत्रात भराव टाकून रस्ते व महामार्ग विकासाची कामे केली जात असल्याचा मुद्दा पूरग्रस्त समितीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उपस्थित केला आहे. या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २०१९ पासून दीडशेहून अधिक गावांतील सरपंचांच्या सहभागाने विविध आंदोलने करण्यात आली आहेत.
महामार्गाच्या कामासाठी नदी क्षेत्रात टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पुराच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत सुमारे १,५०० ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनातून भराव टाकण्याऐवजी पिलर पूल उभारून महामार्ग विकसित करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर या मागणीला मान्यता मिळाल्याचे समितीकडून सांगण्यात आले.
आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत असताना पुन्हा छुप्या पद्धतीने भराव टाकून पुराच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे काम होऊ नये, यासाठी पूरग्रस्त समितीने दक्षता घेण्याची भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे संचालक भैरवा आणि जिल्हाधिकारी राठोड यांच्याकडे जागरूक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, यासाठी बैठका घेण्यात आल्या.
महामार्ग विकास करताना नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम राहणे आणि पूरस्थिती अधिक गंभीर होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. मंजूर झालेल्या पिलर पुलाच्या मागणीची प्रत्यक्ष कामात अंमलबजावणी व्हावी आणि भविष्यात गावांना पुराचा धोका वाढू नये, यासाठी प्रशासनाने कामावर लक्ष ठेवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
पूरप्रवण भागातील गावांचे संरक्षण, नागरिकांची सुरक्षितता आणि महामार्ग विकास यांचा समतोल राखण्यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पूरग्रस्त समितीने व्यक्त केली आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…