अहिल्यानगर | कुकडी-घोड धरणाच्या आवर्तनासाठी घारगाव येथे रास्ता रोको

पाणी सोडण्याची मागणी; निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर | राधेश्याम कुलकर्णी, जिल्हा प्रमुख

अहिल्यानगर. श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे आणि खरीप पिके वाचविण्यासह रब्बी हंगामासाठी पाण्याचे नियोजन व्हावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली घारगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कुकडी व घोड प्रकल्पातून तातडीने शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात परिसरातील अनेक शेतकरी, कार्यकर्ते आणि गावांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कमी पाऊस आणि पाण्याच्या टंचाईमुळे खरीप हंगामातील पिके वाळण्याच्या मार्गावर असून, रब्बी हंगामातील पेरणीवरही संकट निर्माण झाले आहे. ऊस पिकालाही पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कुकडी व घोड प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगत, शेतीसाठी आवर्तन सोडण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
शासनाने प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित पाणी सोडावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला असून, पिकांचे नुकसान झाल्यास त्यांच्या आर्थिक अडचणी अधिक वाढतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.
आंदोलनावेळी बोलताना राजेंद्र म्हस्के यांनी शासनाच्या पाणी नियोजनावर प्रश्न उपस्थित केले. खरीप हंगाम संपत आला असून रब्बी हंगाम सुरू होत असताना शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय अद्याप का घेतला जात नाही, असा सवाल त्यांनी केला. पाणी उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नसेल, तर त्याचा शेतीवर गंभीर परिणाम होईल, असे त्यांनी नमूद केले.
तसेच परिसरातील पाझर तलाव आणि विहिरींशी संबंधित वीजजोडण्या खंडित केल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली.
कुकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी भोसले यांनी २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी नियोजनासंदर्भात बैठक होणार असून, त्यामध्ये निर्णय घेतला जाईल, असे आंदोलनकर्त्यांना सांगितले. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राजेंद्र म्हस्के यांनी दिला.
या आंदोलनात राजेंद्र निळकंठ नागवडे, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब नलगे, माजी सभापती हेमंत नलगे, गोरख उंडे, डॉ. अनिल कोकाटे, माऊली मोटे, बारगुजे, अण्णासाहेब नवले, भास्करराव वागस्कर, संतोष म्हस्के, बाळासाहेब भुरे आणि प्रमोद म्हस्के यांच्यासह विविध गावांतील सरपंच, चेअरमन आणि शेतकरी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण बडवे यांनी केले.
शेतीसाठी पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याचा निर्णय होतो की नाही, याकडे आता श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…