उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार; पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव

बेपत्ता व्यक्तीचा ३७ दिवसांत शोध, तर सहा महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा उघडकीस; अपर पोलीस आयुक्त विनीता साहू यांच्या हस्ते सन्मान

नागपूर, सतीश तोडासे  (प्रतिनिधी) : नागपूर शहरातील उत्तर प्रादेशिक विभागांतर्गत उत्कृष्ट तपास करून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ तसेच पदोन्नतीप्राप्त कर्मचाऱ्यांचा पदचिन्ह प्रतिष्ठापन कार्यक्रम १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी अपर पोलीस आयुक्त श्रीमती विनीता साहू यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशंसापत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

लकडगंज पोलीस ठाण्यात राजेश ऊर्फ राजूभाई पंडया बेपत्ता झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील बेपत्ता व्यक्तीचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. संबंधित व्यक्तीचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महत्त्व, परिचितांचे मोठे जाळे आणि कुटुंबीयांची चिंता लक्षात घेता पोलिसांनी तपासाला गती दिली. लकडगंज पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी ३७ दिवस सक्रियपणे तपास करून विविध दिशांनी प्रयत्न केले आणि बेपत्ता व्यक्तीचा शोध लावण्यात यश मिळवले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी माने, पोलीस हवालदार आनंद मनसकुले, प्रकाश सुरजूसे, लक्ष्मण परतेती, राकेश तिवारी, तसेच पोलीस शिपाई मयूर बन्सोड, विशाल ठाकरे आणि महेंद्र सेलुकर यांचा प्रशंसापत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खापरखेडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने सातत्यपूर्ण प्रयत्न केले. तब्बल सहा महिन्यांनंतर हा गुन्हा उघडकीस आणत अज्ञात आरोपींचा माग काढून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुआ, पोलीस हवालदार मंगेश लांजेवार आणि पोलीस अंमलदार शोएब शेख, बादल गिरी, विशाल नाखले व सूरज कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, पोलीस हवालदार पदावरून सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल शांतीनगर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अमरसिंग ठाकूर, सहायक फौजदार ओमप्रकाश त्रिवेदी आणि तहसील पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार दीपक मेश्राम यांच्यासाठी पदचिन्ह प्रतिष्ठापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छापत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या समारंभात उत्कृष्ट, धाडसी आणि परिणामकारक कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे अपर पोलीस आयुक्त श्रीमती विनीता साहू यांनी कौतुक केले. तपासातील कौशल्य, कर्तव्यतत्परता आणि धाडस यांचे अभिनंदन करत त्यांनी यापुढेही गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख कामगिरी सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…