दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी खा. डॉ. अजित गोपछडेंचे एका महिन्याचे वेतन

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख २६ हजार ७८७ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द

नांदेड,(प्रतिनिधी) : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि दुष्काळ निवारणाच्या प्रयत्नांना हातभार लागावा, या उद्देशाने राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आपल्या एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. २ लाख २६ हजार ७८७ रुपयांचा धनादेश त्यांनी १७ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुपूर्द केला.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांसह कृती आराखड्याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याबरोबरच पाणीटंचाई, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या गरजेवरही चर्चा झाली. दुष्काळाच्या काळात पशुधनाचे संरक्षण आणि चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाने वैरण विकास धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणांतर्गत चारा लागवडीचे क्षेत्र वाढविणे, गायरान व शासकीय पडीक जमिनींचा नियोजनबद्ध वापर करणे आणि चाऱ्याची योग्य साठवणूक करण्यासारख्या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच पशुधन आणि शेतीच्या गरजांचा विचार करून पाणीवाटपाचे नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, खासदार डॉ. अजित गोपछडे गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. दुष्काळामुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या अडचणी, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता याबाबत ते शेतकऱ्यांकडून माहिती घेत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या संबंधित स्तरावर मांडून त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि पशुपालकांना आधार देणे, पशुधनाचे संरक्षण करणे तसेच तातडीच्या मदतीसोबतच दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. गोपछडे यांनी आपल्या एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देऊन दुष्काळ निवारणाच्या प्रयत्नांना हातभार लावला आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…