कुसुमनगर साखर कारखान्याच्या शुभारंभाला विखे पाटील, अशोक चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती

वाघलवाडा येथे एम.व्ही.के. ॲग्रो फुड प्रोडक्ट लिमिटेडच्या कारखान्याचा भव्य शुभारंभ; परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील वाघलवाडा येथे एम.व्ही.के. ॲग्रो फुड प्रोडक्ट लिमिटेडच्या कुसुमनगर साखर कारखान्याचा शुभारंभ सोहळा गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खासदार अशोकराव चव्हाण होते.

या सोहळ्याला माजी मंत्री मकरंद आबा पाटील जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अतुल सावे आणि आमदार सुनील राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे निमंत्रक मारोतराव पा. कवळे गुरुजी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुसुमनगर साखर कारखाना सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…