प्रसन्न देशपांडे यांची भाजपच्या विदर्भ सहसंयोजकपदी नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

मलकापूर : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उद्योग घटकाच्या संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. यामध्ये मलकापूर येथील चैतन्य उद्योग समूहाचे संचालक प्रसन्न देशपांडे यांची उद्योग घटकाच्या विदर्भ सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची घोषणा ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

चैतन्य उद्योग समूहाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रसन्न देशपांडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे मलकापूरसह बुलढाणा जिल्ह्यातील भाजपच्या उद्योग घटकाच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…