अनोमली’च्या नावाखाली मतदारांचा खेळ?

यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप; ‘२००० मध्ये जन्मलेल्या माझ्या मुला-मुलींची नावेही अनोमलीत!

अमरावती ,राज माहोरे (प्रतिनिधी) : मतदार यादीतील कथित ‘अनोमली’चा मुद्दा आता थेट राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे. SIR प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याचा गंभीर आरोप करीत इंडिया आघाडीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रवेश केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मतदार यादीतील कथित घोळावर गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे, या प्रक्रियेचा फटका स्वतःच्या कुटुंबालाही बसल्याचा दावा त्यांनी केला.

‘२००० मध्ये जन्मलेल्या मुला-मुलींची नावे अनोमलीत कशी?’

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “माझ्या मुला-मुलींचा जन्म २००० मधील असतानाही त्यांची नावे अनोमलीमध्ये टाकण्यात आली आहेत.” त्यामुळे SIR प्रक्रियेतील नोंदींच्या अचूकतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापुढे जात त्यांनी सत्तेत बसलेल्या लोकांकडून हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचा गंभीर आरोप केला. मतदार यादीत एखाद्या व्यक्तीचे नाव ‘अनोमली’ म्हणून नोंदविले जाणे ही साधी प्रशासकीय बाब नसून त्याचा थेट परिणाम मतदाराच्या मतदानाच्या अधिकारावर होऊ शकतो, असा मुद्दा आंदोलनातून पुढे आला.

मतदार यादीवरून इंडिया आघाडी आक्रमक

SIR प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, मतदारांच्या नोंदींची योग्य पडताळणी करावी आणि कथित अनोमलीची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. याचबरोबर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. मोर्चादरम्यान घोषणाबाजी वाढल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स उभारले. मात्र, आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आगेकूच केली. त्यामुळे आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप आले.

‘अनोमली’ नेमकी कोण ठरवते? प्रश्न ऐरणीवर

यशोमती ठाकूर यांच्या आरोपामुळे आता मतदार यादीतील ‘अनोमली’ निश्चित करण्याची प्रक्रिया, त्याचे निकष आणि त्यामध्ये समाविष्ट झालेल्या मतदारांची पडताळणी यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः जन्मवर्ष २००० असलेल्या आपल्या मुला-मुलींची नावे अनोमलीत कशी आली, याचा खुलासा निवडणूक यंत्रणेकडून होणार का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी केलेले आरोप त्यांच्या वक्तव्यावर आधारित असून, संबंधित निवडणूक प्रशासनाकडून या आरोपांबाबत अधिकृत स्पष्टीकरण अथवा नोंदींची पडताळणी होणे अपेक्षित आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…