नांदेड, रविंद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी) : महाराष्ट्र अनुसूचित जमाती विकासाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याच्या मागणीसाठी गुरुवार, दि. २४ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे शांततामय बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी कोळी महादेव समाज मराठवाडा विभागाचे अध्यक्ष नागनाथराव घिसेवाड करत आहेत. या आंदोलनाला १५ दिवस पूर्ण झाले असून, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नायगाव (खै.) तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव समाजबांधव जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे उपस्थित झाले.
महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या विकासासाठी शासनाने केलेली आर्थिक तरतूद, प्रत्यक्ष खर्च, योजना, लाभार्थी आणि त्यांना मिळालेला प्रत्यक्ष लाभ यांची अधिकृत माहिती जनतेसमोर आणावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. तसेच शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह, आश्रमशाळा, रोजगार, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रक्रिया आणि न्यायालयीन निकाल याबाबत पारदर्शक व अधिकृत माहिती उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. जनगणनेपासून प्रत्यक्ष लाभापर्यंतची अधिकृत आकडेवारी जनतेसमोर आणावी, तसेच अनुसूचित जमातींसाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद आणि प्रत्यक्ष खर्चाची माहिती जाहीर करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनात आदिवासी कोळी महादेव समाज मराठवाडा विभागाचे अध्यक्ष नागनाथराव घिसेवाड, अॅड. परमेश्वर गोणारे, व्यंकट मुदिराज, आनंदा रेजितवाड, के. एन. जेठेवाड, बालाजी मदेवाड, शाम कोळी धाराशिव, विश्वनाथ चंदलवाड, बाबू जेठेवाड, शंकर कोम्पलवाड, देवराव भंडरवाड, नारायण बोईनवाड, प्रल्हाद जेठेवाड, प्रल्हाद मदेवाड, हणमंत बोईनवाड, देविदास तमनबोईनवाड, बालाजी उलगुलवाड, रमेश जेटेवाड, राजू मदेवाड, दत्ता रेडेवाड, माधव रेडेवाड, शंकर रोडेवाड (सरपंच, बेटक बिलोली), मारोती पिटलेवाड, राम बांचेवाड, विजय भूसेवाड, राजू गादगे, मारोती बिचेवाड, शिवाजी चिंचे आणि त्र्यंबक मदेवाड यांच्यासह नायगाव तालुक्यातील रातोळी, गडगा मांजरमवाडी, होटाळा, नरसी, नायगाव, घुंगराळा, बेटक बिलोली आणि बरबडा येथील कोळी महादेव समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


