नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ): विधान परिषद पदवीधर मतदारसंघातून सौ. दुर्गावती हरिश्चंद्र सरियाम यांनी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या उमेदवार म्हणून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधुकर ऊईके, महासचिव विजय कोकोडे, उपाध्यक्ष प्राचार्य शांताराम ऊईके, महाराष्ट्र राज्याचे सहसचिव सुरेश कन्नाके, श्रीकांत माळवी, हरिश्चंद्र सरियाम, रमेश कोकोडे, अविनाश आत्राम, नंदु ऊईके, दामोदर कोकाटे, शत्रुघ्न कन्नाके, माधुरी कन्नाके, विरेंद्र मरसकोल्हे, संतोष दंडाजे, ॲड. आनंद गजभिये तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा कार्याध्यक्ष राजेश इरपाते आणि वर्धा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव ऊईके उपस्थित होते. याशिवाय दोन्ही संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक जाळे असून, कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदारसंघातील मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी केली आहे. त्यामुळे सरियाम या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना चांगली टक्कर देतील, अशी चर्चा जिल्ह्यांमध्ये सुरू असल्याचे फेडरेशनकडून सांगण्यात आले. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी उमेदवाराच्या विजयासाठी तन, मन आणि धनाने प्रयत्न करावेत, असे आवाहन फेडरेशनचे केंद्रीय सरचिटणीस विजय कोकोडे यांनी केले आहे.


