राष्ट्रीय ओबीसी महासंघाची शहर कार्यकारिणी बैठक; दिल्लीतील आंदोलनावर सखोल चर्चा

आगामी जातीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी

नागपूर, अंशुल जिचकर( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शहर कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच रवीभवन, नागपूर येथे पार पडली. या बैठकीत आगामी जातीय जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याच्या मागणीसह विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.

आगामी जातीय जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम असलाच पाहिजे, असा ठाम सूर या बैठकीत उमटला. तसेच दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या राष्ट्रीय आंदोलनात नागपूर शहरातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले. महासंघाद्वारे आतापर्यंत पार पडलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील काळात छेडण्यात येणाऱ्या आंदोलनांची दिशा ठरवण्यात आली.

या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष परमेश्वर राऊत, नगरसेवक शकील पटेल, गुणेश्वर आरीकर, घनश्याम मांगे, किशोर शिरपूरकर, रामभाऊ कावडकर, पुरुषोत्तम मुरमे, एकनाथ काळमेघ, सुरेश कोंगे, सुरेश जिचकार, ज्ञानेश्वर ठाकरे, त्रिलोचन व्यवहारे, प्रतीक व्यवहारे, प्रशांत तिडके, हेमंत गावंडे, डॉ. सुधाकर तायवाडे, विनोद इंगोले, माजी नगरसेवक नाना झोडे, वृंदा ठाकरे, अनिता ठेंगरे, नंदा देशमुख, अविनाश घागरे, बाबा ढोबळे, चंद्रकांत हिंग, उदय देशमुख, गणेश गाडेकर, दौलत शास्त्री, मंगेश कामोने, संजय मांगे, केशव शास्त्री, राहुल खैरकर, राजेश काकडे यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व विंगचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…