नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी भेट; पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधी) : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी श्री. सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज नागपूर येथे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी श्री. सुधाकर कोहळे यांची भेट घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांना उमेदवारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

या भेटीप्रसंगी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री. सुधाकर कोहळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार श्री. समीर मेघे, आमदार श्री. परिणय फुके, नागपूरच्या महापौर सौ. नीता ताई ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…