नागपूर , अंशुल जिचकार (प्रतिनिधी) : नागपूर शहर काँग्रेस कमिटी अंतर्गत दक्षिण नागपूर क्षेत्रातील ब्लॉक क्रमांक ४ चा पदग्रहण समारंभ नुकताच रमणा मारुती परिसरात पार पडला. यावेळी नागपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रफुल गुडधे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव गिरीश पांडव, ब्लॉक ४ चे माजी अध्यक्ष प्रवीण गवरे, नगरसेवक सुहास नानवटकर, राजेश पौनीकर, ज्येष्ठ कार्यकर्ते ईश्वर ढोले, युवक काँग्रेस प्रदेश सचिव रोमा चौधरी, रंजना कडुकर, वैशाली वानखेडे, राजू मोहोड, पुरुषोत्तम मुरमे, सुरेश जिचकार, एकनाथ काळमेघ, महेश बांते, सौरभ काळमेघ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी ब्लॉक ४ चे नवनियुक्त अध्यक्ष राहुल अभंग यांनी नागपूर शहरातील सर्वात पहिली कार्यकारिणी जाहीर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. नवनियुक्त कार्यकारिणीमध्ये मोरेश्वर वंजारी, प्रकाश जाधव, संजय बडवाईक, रोशन बुधबावरे, राहुल श्रीराव, नाना शेंडे, विनोद राऊत, दिलीप कोसारे, भास्कर अत्तकरी, मनोज हिवरे, मनदीप ताम्रकार, जयचंद गाथणे, सागर तुर्केल, आनंदराव वानाईत, किशोर कुंभारे, मुकुंद हटवार, आकाश लोखंडे, नरेश लांजेवार, मनोज कारलेवार, मोहसिन खान, आकीब शेख, हिमांशू शहाकार, योगेश होपे, प्रसाद झाडे, आशीष मस्ते, हार्दिक खोरगडे, महेश वैरागडे, प्रकाश फेतफुलवार, आनंद वानाईत, क्षितीज इंगळे, मधुकर पडोळे, ईशांतकुमार थामदेव भाकरे, सुरेश घोरे, नितीन काकडे आणि पियुष गुडधे यांचा समावेश आहे.


