रौप्यमहोत्सवी रक्तदान शिबिरात १३५ रक्तदात्यांचा सहभाग

‘करुणी दान रक्ताचे, फुलवा जीवन रुग्णांचे’ या ब्रीदाने जनकल्याण प्रबोधिनीची २५ वर्षे अविरत सेवा

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) :  ‘करुणी दान रक्ताचे, फुलवा जीवन रुग्णांचे’ हे ब्रीद घेऊन गेली २५ वर्षे अविरत सेवा करणाऱ्या स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १२ महिलांसह १३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. अहिल्यानगरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास मढीकर व रक्त संकलन पथकाच्या सहकार्याने रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी जनकल्याण प्रबोधिनी, भिंगार यांच्यावतीने २५व्या वर्षाचे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

रक्तदान शिबिरासाठी गेली अनेक वर्षे मदत-सहकार्य करणाऱ्या श्रीमती शोभाताई भंडारी व परिवार, संस्थेचे सभासद, हितचिंतक तसेच भिंगारमधील विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी यांनी नेहमीप्रमाणे सहकार्य केले. संस्थेने रक्तदान शिबिर सुरू केल्यापासून आजपर्यंत दरवर्षी नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी रक्तदान शिबिरानिमित्त अनेक संस्था व मान्यवरांनी भेट देऊन प्रबोधिनीच्या कार्याचा गौरव केला. गेली अनेक वर्षे देशमुख सांस्कृतिक हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मकरंद देशमुख आणि सुदर्शन कुंटे यांचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुळे व सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या शिबिरात युवकांची संख्या लक्षणीय होती. यापुढील काळातही असेच सहकार्य करावे, असे आवाहन स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले. निरपेक्ष भावनेने स्वेच्छेने केलेल्या रक्तदानामुळे अनेक रुग्णांना मदत होऊन त्यांना जीवदान मिळणार आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मुळे यांनी व्यक्त केले.रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी रुपेश भंडारी, कार्याध्यक्ष; सेवाकार्य प्रकल्प समिती प्रमुख सुनील तरवडे, शिबिर संयोजक तसेच संचालक मंडळ, स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी, भिंगार-अहिल्यानगर यांनी परिश्रम घेतले. गेली २५ वर्षे स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनीच्या स्थापनेपासून जनसेवेचे व्रत घेऊन कार्य करणारे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुळे यांचा राऊत परिवार तसेच निलेश लोढा यांच्यासह अनेकांनी हृदयपूर्वक सन्मान केला.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…