गांधी जयंतीनिमित्त टाटा मोटर्समध्ये स्वच्छता अभियान; ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे, प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड, चिखली प्लांट येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत या अभियानात ३०० हून अधिक कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

अभियानादरम्यान कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या “स्वच्छ भारत, सुंदर भारत”, “ग्रीन इंडिया, क्लीन इंडिया” आणि “एक कदम स्वच्छता की ओर” अशा घोषणांमधून जनजागृती केली. कर्मचाऱ्यांनी टाटा मोटर्सच्या परिसरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष स्वच्छता केली. यावेळी प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने वर्गवारी करण्यात आली आणि नियोजित पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कर्मचारी स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक कार्यस्थळासाठी सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले.

या अभियानाला टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, पुणेचे प्लांट हेड श्री. नीरज अग्रवाल, ईआर हेड श्री. संतोष बडे आणि विविध शॉप हेड्स यांची उपस्थिती लाभली. तसेच टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, कार प्लांटचे अध्यक्ष श्री. संजीव आसवले यांच्यासह युनियन प्रतिनिधी श्री. संतोष कापसे, श्री. राजू नातू, श्री. मुकेश काटे आणि श्री. दत्तात्रय गुजर, तसेच कर्मचारी श्री. पांडुरंग सुतार, श्री. प्रकाश चव्हाण, श्री. संतोष कळमकर, श्री. प्रकाश माळी यांच्यासह ३०० कामगारांनी सहभाग नोंदविला. CSR SPOC श्रीमती शीतल जगताप यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात आला. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून “स्वच्छतेमध्ये सहभाग – स्वच्छ भारत, विकसित भारत” हा संदेश देत कर्मचारी स्वयंसेवकांनी कृतीतून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…