कोठला गोवंश कत्तल प्रकरणी पोलिसांच्या कारवाईचे गौरक्षकांकडून स्वागत

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) :  शहरातील कोठला परिसरात गोवंशाची बेकायदेशीर कत्तल व साठवणुकीच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत माजी नगरसेवक मुजाहिद (भा.) कुरेशी यांच्यासह संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १११ अंतर्गत संघटित गुन्हेगारीची तरतूद लागू केल्याबद्दल समस्त गौरक्षकांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मानद पशुकल्याण प्रतिनिधी, भारत सरकार मयूर सिंह राजपुरोहित यांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली होती. या निवेदनाची तातडीने दखल घेत पोलिसांनी संबंधित प्रकरणात कठोर कायदेशीर पाऊल उचलल्याचे गौरक्षकांनी म्हटले आहे. कोठला परिसरातील कथित गोवंश कत्तल व साठवणुकीच्या प्रकरणात यापूर्वीही कारवाई झाल्याचा दावा करण्यात आला असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे गौरक्षकांनी म्हटले आहे.

BNS कलम १११ अंतर्गत कारवाईमुळे कायद्याचा धाक निर्माण होऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा गौरक्षकांनी व्यक्त केली. तसेच गोवंश संरक्षणाच्या दृष्टीने पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.या कारवाईबद्दल समस्त अहिल्यानगर नागरिक आणि गोभक्तांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. पुढील तपास निष्पक्षपणे करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही मानद पशु कल्याण प्रतिनिधी मयुरसिंग राजपुरोहीत यांनी केली आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…