अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतूळ येथील जागृत श्री वरदविनायक मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच श्री गणरायाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. परिसरातील अनेक भाविकांनी अनवाणी पायी येऊन श्री वरदविनायकाचे दर्शन घेत नवसपूर्ती केली.

अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटे ५ वाजता प्रभातगीत गायनाने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळी प्रणव परशुरामी यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. दिवसभर जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सायंकाळी मंदिर परिसरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले. विद्या परशुरामी, प्रज्ञा भाटे, वृषाली समुद्र व प्रियांका पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने भाविकांनी अथर्वशीर्ष पठणात सहभाग घेतला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला. यानंतर सौ. पल्लवी व डॉ. सतीश वाळुंज यांनी सपत्नीक श्री वरदविनायकाची महाआरती केली. देवस्थानच्या वतीने विनय समुद्र यांनी त्यांचा सन्मान केला.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घेतले श्री वरदविनायकाचे दर्शन

अंगारकी चतुर्थीनिमित्त अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी श्री वरदविनायक मंदिराला भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भाविकांसोबत महाप्रसादाचा लाभ घेतला. देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. सुभाष सोमण, डॉ. कपिल कातोरे, डॉ. गोरक्ष वाकचौरे, डॉ. संतोष देशमुख, डॉ. सोपान कवडे, डॉ. उत्तम गुंजाळ, डॉ. अभिजित देशमुख, रविंद्र आरोटे, योगेश देशमुख, भाऊसाहेब पोखरकर, बाबाजी देशमुख, योगेश समुद्र, अविनाश गिते, अजित आरोटे, सागर सोनुले, सुभाष घाटकर, प्रदीप नेवासाकर यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांना देवस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी असल्याने सायंकाळच्या सुमारास कोतूळ–राजूर रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…