शिधापत्रिकाधारकांनी e-KYC पूर्ण करून लाभ सुरक्षित करावा

रामटेक तालुक्यातील नागरिकांना राजकुमार खोब्रागडे यांचे आवाहन

रामटेक, प्रशांत भोयर ( प्रतिनिधी ) :  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांचे आधार आधारित e-KYC पूर्ण करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रामटेक तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपल्या शिधापत्रिकेवरील प्रत्येक लाभार्थ्याचे e-KYC पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन शिवसेनेचे रामटेक उप तालुका प्रमुख तथा दक्षता समितीचे अध्यक्ष राजकुमार ज्ञानेश्वरजी खोब्रागडे यांनी केले आहे.

शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांची ओळख अधिक अचूक व सुरक्षितपणे निश्चित करण्यासाठी e-KYC प्रक्रिया महत्त्वाची आहे. e-KYC पूर्ण झाल्यानंतर आधारशी संबंधित उपलब्ध माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची ओळख पडताळणी करण्यात येते. तसेच लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यास आणि शिधावितरण व्यवस्थेत पारदर्शकता राखण्यास मदत होते. रामटेक तालुक्यातील नागरिकांनी आपल्या शिधापत्रिकेवरील कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांचे e-KYC पूर्ण झाले आहे का, याची खात्री करावी. e-KYC बाकी असल्यास जवळच्या रास्त भाव दुकानात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला तसेच ग्रामीण भागातील e-KYC प्रक्रियेची माहिती नसलेल्या नागरिकांना याबाबत आवश्यक सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. “आपले e-KYC पूर्ण करा आणि शिधापत्रिकेचा लाभ सुरक्षितपणे घ्या. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचा शासकीय हक्काचा लाभ मिळावा, यासाठी आपण सर्वांनी e-KYC पूर्ण करण्यासाठी सहकार्य करूया,” असे राजकुमार ज्ञानेश्वरजी खोब्रागडे यांनी म्हटले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…