राहुरी कृषी विद्यापीठात संगीत मैफलीत पवन नाईक यांचे वरुणराजाला साकडे

‘गाणी तुमची आमची – सुफी दरबार’मध्ये मराठी, हिंदी, पंजाबी, उर्दू, ब्रज गीतांची बहार

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख ): महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी नादब्रह्म संगीतालय, अहिल्यानगर प्रस्तुत आणि आंतरराष्ट्रीय शास्त्रीय, सुगम व सुफी गायक पवन श्रीकांत नाईक निर्मित ‘गाणी तुमची आमची – सुफी दरबार’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले. मराठी, हिंदी, पंजाबी, उर्दू व ब्रज भाषेतील प्रसिद्ध गीतांनी मैफल रंगली. बळीराजासाठी वरुण देवता (झुलेलाल) यांच्यावर आधारित तसेच भारतीय संस्कृतीतील विविध देवी-देवतांना आवाहन करणाऱ्या सुख-समृद्धीच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांचा मैफलीत जाणीवपूर्वक समावेश करण्यात आला.

संगीत मैफलीत मुख्य गायक पवन श्रीकांत नाईक, गायिका सरोज पालडीया, कल्याण मुरकुटे व पंकज नाईक (संवादिनी), कुलदीप चव्हाण (बेंजो), स्मिता राणा (सतार), सालोमन पेहेलवान (व्हायोलिन), प्रणव देशपांडे (सिंथेसायझर), सुरज शिंदे (तबला), आदित्य मोरे (ड्रम), नेगीन काजे़मी (डफ, तेहरान-इराण) यांनी सहभाग घेतला. सहगायक म्हणून निनाद पारखी, श्रेयस शीत्रे, पवन तळेकर, मूलांशु परदेशी, अथर्व कोरडे, ऋषी त्रिवेदी, आश्लेषा मोरे, जयंत पाठक व विजय जाधव यांनी साथ दिली. सूत्रसंचालन दिप्ती शुक्रे व संकेत गांधी यांनी केले. ध्वनी व्यवस्था रवी जाधव तर प्रकाश योजना सागर चव्हाण यांनी सांभाळली.

पवन श्रीकांत नाईक यांनी गणेश वंदना ‘गणपती बाप्पा के दरबार’ने मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर शिवस्तुती ‘खंडेरायाच्या लग्नाला’ आणि लोकसाहित्यातील पठ्ठे बापूराव यांनी रचलेली कृष्ण भक्तिपर गवळण ‘दहिवाली मी गवळ्याची नार’ या रचना सादर करण्यात आल्या. उत्तरार्धात सुफी रचनांनी मैफलीला वेगळा रंग दिला. ‘सांसों की माला’, ‘पग घुंगरू बांध मीरा नाची थी’ (सरगम), ‘सेवण वाला पीर झुले लाल’, ‘किन्ना सोणा तैनू रब ने बनाया’, ‘तेरे वज्जो दिल दिया मेहरम’, ‘जुर्म सिर्फ इतना है’ आणि ‘मेरे रश्के कमर’ या प्रसिद्ध रचना सादर करण्यात आल्या. मूलांशु परदेशी यांनी ‘आली भवानी राऊळात’ ही देवी स्तुती सादर केली, तर सरोज पालडीया यांच्या बोल आलाप व तानांनी मैफलीत रंगत भरली.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय गायक पवन नाईक यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, सहाय्यक कुलसचिव व्ही. टी. पाटील, डॉ. अधीर आहेर, डॉ. भगवान देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…