सातारा, आशिष औंढेकर ( प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र ) : ग्रंथालय भारतीच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘ग्रंथभारती’ दिवाळी अंकाच्या नियोजनासाठी सातारा येथे बैठक उत्साहात संपन्न झाली. दिवाळी अंकाच्या निर्मितीबाबत बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस ग्रंथालय भारतीचे केंद्रीय संचालक प्रा. विश्वास नेरकर, पश्चिम प्रांत सचिव डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर, पश्चिम प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. सुरेश गायकवाड तसेच इतर पदाधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
आगामी दिवाळी अंक अधिक दर्जेदार व वाचनीय करण्याच्या दृष्टीने बैठकीत विविध साहित्यिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. अंकासाठी जाहिराती मिळविणे, दर्जेदार लेख संकलित करणे तसेच कविता स्वीकारणे याबाबत नियोजन निश्चित करण्यात आले. साहित्यिक, लेखक, कवी तसेच ग्रंथप्रेमींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. ‘ग्रंथभारती’ दिवाळी अंक हा साहित्य, ग्रंथालय चळवळ आणि वाचनसंस्कृतीला समृद्ध करणारा विशेषांक ठरावा, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.


