थाळी मार्च आंदोलनाच्या दणक्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने मेसची दरवाढ पूर्णपणे रद्द केली

एसएफआयच्या आंदोलनाला यश; परिपत्रक क्रमांक २०८/२०२६ रद्द

पुणे ,राजन शेळके ( प्रतिनिधी ) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहामध्ये प्रशासनाने केलेल्या मेस दरवाढीच्या विरोधात एसएफआयच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी जोरदार थाळी मार्च आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या दणक्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने मेसची दरवाढ पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

२१ सप्टेंबरपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मेस दरवाढीच्या विरोधात एसएफआयच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत मेस दरवाढीच्या प्रश्नासंदर्भात विद्यापीठाच्या मा. कुलगुरूंसोबत तीन वेळा बैठक झाली. तिसऱ्या बैठकीत २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंकडून देण्यात आले. या सकारात्मक प्रतिसादानंतर बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते आणि २६ सप्टेंबर रोजी थाळी मार्च नियोजित करण्यात आला होता. नियोजित वेळापत्रकानुसार २६ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या मुख्य गेटपासून मुख्य इमारतीपर्यंत थाळी मार्च आंदोलन काढण्यात आले. या आंदोलनात सुमारे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. एसएफआयच्या या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक क्रमांक २०८/२०२६ रद्द केले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व एसएफआयचे राज्य सचिव सोमनाथ निर्मळ, राज्य सह-सचिव निशा साबळे, राज्य उपाध्यक्ष नवनाथ मोरे, जिल्हा अध्यक्षा संस्कृती गोडे यांच्यासह अभिषेक शिंदे, निकिता मेचकर, आदित्य कासारे, गणेश जानकर, आकाश लोणकर, सोमनाथ वामन, पवन जाधव, कणद विश्वास, विघ्नेश, सृष्टी घुमरे, ऋषिकेश शिंदे, सृष्टी लोखंडे, एकता सक्राते, मोसिन बनकर, मयूर हिले, सोनाली जाधव, काजल कासारे, उमंग बुरांडे, कृष्णा रक्ताटे, वैष्णवी रक्ताटे, हनुमान शिंदे, सुशांत जाधव, आदित्यन, तनिष्का भंडारी आणि हेतवी आदींनी केले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…