उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची लोह्यात दुष्काळसदृश भागाची पाहणी

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कमी पडणार नाही : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

लोहा, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधि ) : पावसाने खंड दिल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पाहणी करत आहोत. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पाणी समस्या, पशुधन, चारा तसेच शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शनिवारी (२६ सप्टेंबर) नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पीक पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आल्या होत्या. सकाळी साडेनऊ वाजता लोहा शहरातील कंधार रोडस्थित शिवाजी वाघमारे यांच्या शेतात त्यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केली.

यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पाटील पवार, जिल्हाध्यक्ष रावणगावकर, कार्याध्यक्ष माधव पावडे, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी नगराध्यक्ष केशवराव मुकदम, हरिभाऊ चव्हाण, भास्कर पवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे, कृषी अधिकारी कासराळे, पाणीपुरवठा उपअभियंता बनसोडे, इंजि. कराड, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता शिवाजी राठोड, माजी जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी, चित्राताई लुंगारे, माजी नगराध्यक्ष अनुसया केंद्रे, माजी सभापती बाबुराव केंद्रे, कंधार उपनगराध्यक्ष मनान चौधरी, जफ्रॉद्दीन बाहोद्दीन यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

प्रत्यक्ष पाहणीनुसार पंचनामे करण्याचे आदेश

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “पावसाच्या खंडामुळे सगळीकडे दुष्काळसदृश परिस्थिती दिसत आहे. शेतकऱ्यांनी मला अनेक वेळा भेटून आपली व्यथा सांगितली होती. आज प्रत्यक्ष पाहणी केली असता परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात आले आहे.” “सरकारला या गंभीर परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे. केवळ कागदावरील आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाहणीनुसार पंचनामे करण्याचे आदेश संपूर्ण प्रशासनाला देण्यात आले आहेत. जे रिपोर्ट येतील त्यावर सरकार तात्काळ ॲक्शन घेणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारने याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. शेतकऱ्यांचे पाणी असो, पशुधन असो, चारा असो किंवा त्यांच्या मुलांचे शिक्षण असो, या सर्व बाबतीत सरकार गंभीर आहे. ज्याचे जसे नुकसान झाले आहे, त्याप्रमाणे नक्कीच मदत दिली जाईल. त्यामुळे कोणीही काळजी करू नये,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

पहिलाच दौरा प्रतापरावांच्या मतदारसंघात

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दुष्काळी दौरा सुरू झाला असून, मराठवाड्यातील २६ सप्टेंबरच्या त्यांच्या पहिल्याच दौऱ्याची सुरुवात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मतदारसंघातून झाली. पुढे मर्डस गाव (गंगाखेड) येथे त्यांनी पाहणी केली. दरम्यान, लोह्याकडे येताना सोनखेड येथेही त्यांनी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

स्व. अजितदादा पवार यांची आठवण

दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदाच आल्या. आजच्या त्यांच्या दौऱ्यात स्व. अजितदादा पवार यांची आवर्जून आठवण झाली. शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मृती जाग्या केल्या. हा प्रसंग भावुक होता. मात्र, अजितदादांप्रमाणेच खंबीरपणे मी तुमच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…