अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : अहिल्यानगरपासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या पिंपळगाव माळवी येथे जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून २१ सप्टेंबर २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा १०४ महिला व पुरुष रुग्णांनी लाभ घेतला. यापैकी ४५ रुग्णांना ५० रुपये या अल्प दरात चष्मे देण्यात आले.
याकामी कीर्ती ऑप्टिकलचे मा. श्री. विनोद दोषी व श्री. थिगळे सर यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिरात १७ नेत्रबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्ण आढळले. त्यापैकी १० रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पद्मश्री मनोहर डोळे संस्थेच्या नेत्र रुग्णालय, नारायणगाव येथे रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले. या शिबिरासाठी मा. अध्यक्ष अरविंद पारगावकर, प्रांत सहसचिव महेंद्र जाखेटे, प्रांत आरोग्य प्रमुख डॉ. निळकंठ ठाकरे, प्रांत छात्रवास सदस्य विशारद पेठकर, सदस्य नानासाहेब गुरसळ व सचिव अनंत पुंड उपस्थित होते.
शिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा संघटन मंत्री हरिजीत माळी, हरिश्चंद्रजी थिगळे, श्री. विनोद दोषी व जिल्हा हितरक्षा प्रमुख संदिप गायकवाड यांनी परिश्रम घेतले. सौ. सुरेखाताई वाघ यांनी चहापानाची व्यवस्था केली.


