नागपूर,सतीश तोडासे (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या (DSO) वतीने नागपूर येथील विद्यापीठाच्या मैदानावर आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य, समन्वय आणि सांघिक भावना यांचे प्रभावी प्रदर्शन करत सरस्वती विद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल संघाने द्वितीय स्थान पटकावले.
या संघात सेजल, सृष्टी, स्वरा, अक्षदा, मुक्ता, सृष्टी, भूमी, हर्षदा, शर्वरी आणि मृण्मयी यांचा समावेश होता. खेळाडूंनी शिस्तबद्ध खेळ आणि उत्तम सांघिक समन्वयाचे प्रदर्शन करत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. या संघाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. ब्रिजमोहन रावत, श्री. पुष्पक तांबेकर आणि वैभव कुंभरे यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. विद्यालयाचे व्यवस्थापन, मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश, उपमुख्याध्यापिका सौ. शैली अय्यर, तसेच पर्यवेक्षक श्री. राहुल घोडे आणि श्री. शैलेंद्र ठाकूर यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले.


