हिंदू समाजाला असहिष्णु ठरविण्याचा प्रयत्न योग्य नाही : शंकर गायकर

हामिद अन्सारी यांच्या वक्तव्यावर शंकर गायकर यांचे भाष्य; “भारताची परंपरा सहिष्णुतेची”

अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) : माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी हिंदू दक्षिणपंथीय सांप्रदायिकतेचा भारताला धोका असल्याचे सांगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जुन्या विधानाचा संदर्भ दिल्यानंतर या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री तथा प्रवक्ते शंकर गायकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अन्सारी यांनी १८ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे ए. जी. नूरानी यांच्या स्मृतिव्याख्यानात हे भाष्य केले होते.

गायकर म्हणाले, “हिंदू समाजाला असहिष्णू ठरविण्याचा आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. भारताची हजारो वर्षांची संस्कृती ही सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि विविधतेचा स्वीकार करणारी आहे. त्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाच्या राष्ट्रभावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही.” “जर हिंदू समाज असहिष्णू असता, तर भारतात विविध धर्म-संप्रदायांना शतकानुशतके स्थान मिळाले नसते. आज देशातील विविध समाजघटकांना मिळणारे घटनात्मक अधिकार, सामाजिक आणि शैक्षणिक सुविधा तसेच सार्वजनिक जीवनातील सहभाग ही भारतीय लोकशाहीची वस्तुस्थिती आहे,” असे गायकर यांनी नमूद केले.

नेहरूंच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांमध्ये एका विशिष्ट समाजाला झुकते माप दिल्याची भावना हिंदू समाजामध्ये निर्माण झाली. या धोरणांचा ऐतिहासिक परिणाम म्हणून देशाची फाळणी झाली, असा आमचा राजकीय व ऐतिहासिक आक्षेप आहे. मात्र आजच्या भारतातील प्रश्नांचा विचार करताना वर्तमान संविधानिक व्यवस्था आणि सर्व नागरिकांची समानता हीच केंद्रस्थानी असली पाहिजे,” असे ते म्हणाले. अन्सारी यांच्या वक्तव्यावर टीका करताना गायकर यांनी पुढे म्हटले, “माजी उपराष्ट्रपतीसारख्या घटनात्मक पदावर काम केलेल्या व्यक्तीकडून देशातील एका मोठ्या समाजाच्या राष्ट्रवादी विचारांकडे संशयाने पाहिले जाणे दुर्दैवी आहे. त्यांच्या सार्वजनिक भूमिकांबाबत यापूर्वीही मतभेद व्यक्त झाले आहेत. आजही त्यांच्या वक्तव्यांमधून एका विशिष्ट दृष्टिकोनाला अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना निर्माण होते.”

“हिंदू राष्ट्रवाद म्हणजे कोणत्याही धर्माविरुद्ध द्वेष नव्हे. भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना ही या देशाच्या परंपरा, इतिहास आणि सांस्कृतिक सातत्याशी जोडलेली आहे. हिंदू समाजाला लक्ष्य करण्याऐवजी सामाजिक सलोखा, समान नागरिकत्व आणि राष्ट्रहित यावर संवाद व्हायला हवा,” असेही गायकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अन्सारी यांनी नूरानी यांच्या The RSS: A Menace to India या २०१९ मधील पुस्तकाचा संदर्भ देत नागरिक राष्ट्रवादाऐवजी सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे होणाऱ्या कथित बदलाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपसह विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…