गणपती बाप्पाच्या आगमनदिनी आकाशात चंद्रकोर अन् तेजस्वी शुक्र तारा; बळीराजाची चिंता वाढली

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी) : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी सायंकाळी अवकाशात चंद्रकोर आणि त्याच्या शेजारी तेजस्वी शुक्र तारा असे नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले. अनेक नागरिकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपले. एल निनोच्या प्रभावामुळे प्रशांत महासागरातील उष्मांक वाढल्याचे मत तज्ज्ञांनी माध्यमातून व्यक्त केले आहे. परिणामी गणपती स्थापनेच्या दिवशी वरुणराजाचे आनंद देणारे आगमन झाले नाही. बाप्पा कोरडे आले, भिजले नाहीत व भिजवलेही नाहीत, ही चिंताजनक बाब आहे.

आता परतीच्या पावसाचा अतिशय अल्प कालावधी शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस न झाल्याने शेतातील पिके करपू लागली आहेत. निसर्गाने काही चमत्कार केला, श्रीगणेशाने भाविकांवर कृपा केली आणि उर्वरित कालावधीत पावसाने हजेरी लावली तरच शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी पुढील वर्षाचे चित्र आशादायक राहील. अन्यथा दुष्काळी परिस्थितीचा सामना केल्यावाचून पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण होत आहे. अवकाशातील चंद्रकोर आणि शुक्र ताऱ्याचे दृश्य नयनरम्य असले, तरी बळीराजाची चिंता वाढवणारे आहे, हे तितकेच खरे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार; २८ वर्षीय आरोपी अटकेत

नांदेड रवींद्र ओंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर…

ऋषीपंचमीनिमित्त दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

पुणे : ऋषीपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात ३५ हजारांहून अधिक महिलांनी सहभागी होत गणरायाला नमन केले. ‘ओम नमस्ते गणपतये’, ‘मोरया…