ऋषीपंचमीनिमित्त दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

पारंपरिक वेशातील महिलांच्या उपस्थितीने पुण्यात भक्तिमय वातावरण; उपक्रमाचे ४१वे वर्ष

पुणे : ऋषीपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात ३५ हजारांहून अधिक महिलांनी सहभागी होत गणरायाला नमन केले. ‘ओम नमस्ते गणपतये’, ‘मोरया मोरया’ आणि ‘ओम गं गणपतये नमः’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.

ट्रस्टच्या १३४ व्या वर्षातील गणेशोत्सवानिमित्त उत्सव मंडपासमोर गणेशोत्सवातील प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीसमोर हा सोहळा पार पडला. या उपक्रमाचे यंदा ४१वे वर्ष होते. पावसाचे वातावरण असतानाही मध्यरात्री २ वाजल्यापासून महिलांनी पारंपरिक वेशात कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास सुरुवात केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महिलांनी शंखनाद केला. त्यानंतर ओंकार जप आणि गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण करून गणरायाला नमन केले. ‘मोरया मोरया दगडूशेठ मोरया’च्या जयघोषाने उत्साहाला उधाण आले. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांची मोठी गर्दी झाली होती. महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, सचिन आखाडे, अंकुश रासने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “उत्सवात महिला तयार होऊन येते किंवा उत्सवाची तयारी करते तेव्हाच तो उत्सव पूर्ण होतो. संपूर्ण पुणे शहरासाठी शक्ती आणि ऊर्जा या माध्यमातून निर्माण झाली आहे.” मुंबई, सातारा, कोल्हापूर, लातूर आदी शहरांमधूनही महिला या उपक्रमासाठी सहभागी झाल्या. अर्चना भालेराव आणि प्रा. डॉ. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार; २८ वर्षीय आरोपी अटकेत

नांदेड रवींद्र ओंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर…

गणपती बाप्पाच्या आगमनदिनी आकाशात चंद्रकोर अन् तेजस्वी शुक्र तारा; बळीराजाची चिंता वाढली

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी) : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी सायंकाळी अवकाशात चंद्रकोर आणि त्याच्या शेजारी तेजस्वी शुक्र तारा असे नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले. अनेक नागरिकांनी हे दृश्य आपल्या…