शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची सरस्वती विद्यालयाला आकस्मिक भेट

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शाळेची पाहणी; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माननीय शिक्षणमंत्री श्री. दादाजी भुसे यांनी सकाळी ७.३० वाजता सरस्वती विद्यालय, शंकर नगर, नागपूर येथे आकस्मिक भेट देऊन शाळेची पाहणी केली.

या भेटीदरम्यान माननीय शिक्षणमंत्र्यांसोबत शिक्षण विभागाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ उपस्थित होते. यामध्ये नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे, DIET प्राचार्य डॉ. हर्षलता, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर श्री. अनिल दहिफळे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नागपूर श्री. निलेश गुंड यांचा समावेश होता. भेटीदरम्यान दादाजी भुसे यांनी शाळेच्या सकाळच्या प्रार्थना सभेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत सकाळची प्रार्थना तसेच राष्ट्रगीत गायले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

प्रार्थना सभेनंतर शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक अनुभवांविषयी, अध्ययन प्रक्रियेविषयी आणि शाळेतील विविध उपक्रमांविषयी जाणून घेतले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे संवाद साधत आपल्या अनुभवांची माहिती दिली. यानंतर  भुसे यांनी शाळेच्या परिसराची सखोल पाहणी केली. त्यांनी वर्गखोल्या, विज्ञान प्रयोगशाळा तसेच विविध शैक्षणिक विभागांची पाहणी करून शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सोयींचा आढावा घेतला.

भेटीच्या समारोपप्रसंगी शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. रेशमी उमेश, तसेच प्राथमिक विभागाचे प्रभारी श्री. सोनू परास्कर यांच्यासोबत संक्षिप्त संवाद साधण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधांचा विकास आणि संस्थेच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. माननीय शिक्षणमंत्र्यांची ही आकस्मिक भेट विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकवृंदासाठी प्रेरणादायी ठरली. त्यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणाला नवी ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळाले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…