वर्धा येथील अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुजात आंबेडकरांची भेट

अमरावती जिल्ह्यातील युवा विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे सागर भवतेंचे आवाहन

तिवसा, राज माहोरे ( प्रतिनिधी ) :  वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयात जातीय द्वेषातून केल्या जाणाऱ्या वर्तणुकीचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अनिश्चितकालीन सत्याग्रहाला आज, १० सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर भेट देऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनात अमरावती जिल्ह्यातील युवा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केले आहे.

वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयातील मागासवर्गीय बहुजन विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे विश्वविद्यालयाच्या वतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना विश्वविद्यालयातून बाहेर काढण्यात आले होते. विश्वविद्यालय परिसरात ‘जय भीम, जय संविधान’ नारा देणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. यासह इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी ६७ दिवसांपासून अनिश्चित काळासाठी सत्याग्रह सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील समस्त संविधानवादी विद्यार्थ्यांनी वर्धा येथील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…