अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( प्रतिनिधी ): भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर शहर जिल्हा ओबीसी युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या जिल्हा बैठकीत नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
नवनिर्वाचित ओबीसी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रीकांत फंड यांच्या नेतृत्वाखाली युवा टीम पक्षाची विचारधारा युवकांमध्ये रुजविण्यासह पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी प्रतीक डहाळे व तुषार आंबेकर, सरचिटणीसपदी वैभव वाघमारे, विजय बेलेकर व संतोष ताठे, तर चिटणीसपदी सुशील थोरात, ओम हजारे, निलेश पालवे व वैभव गदादे यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पक्ष संघटन वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.


