जिल्ह्यातील जनहिताच्या विविध प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत काँग्रेसची बैठक

डफरीन अग्निकांडाच्या चौकशी अहवालासह शेतकरी, आरोग्य, आदिवासी भाग आणि वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नांवर चर्चा

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील तसेच शहरातील विविध जनहिताच्या आणि प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

अमरावती येथील डफरीन रुग्णालयातील NICU मध्ये झालेल्या दुर्दैवी अग्निकांडात निष्पाप नवजात बालकांचा बळी गेला होता. या घटनेला बराच कालावधी उलटूनही अद्याप चौकशीचा अहवाल समोर आलेला नाही. या गंभीर प्रकरणाचा अहवाल तातडीने जाहीर करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच इर्विन रुग्णालयातील विविध समस्या, रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणी, आरोग्य सुविधांमधील त्रुटी आणि आवश्यक उपाययोजनांबाबतही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, शेतीशी संबंधित अडचणी, आदिवासी भागातील नागरिकांच्या समस्या तसेच शहर आणि जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीवरही बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. विशेषतः शहरात वाढत असलेल्या MD ड्रग्सच्या विळख्यामुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत असून, अमली पदार्थांच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मुद्दे समजून घेत त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री सुनीलभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप, विरोधी पक्षनेते व माजी महापौर विलासभाऊ इंगोले, शहराध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, काँग्रेस पदाधिकारी हरीभाऊ महोड, जयश्रीताई वानखेडे, कांचनमाला ताई गावंडे, राहुल येवले, वैभव वानखेडे, मिलिंदभाऊ चिमोटे यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUIचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…