पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वकील पॅनेलवर सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅड. राजेश उगमसिंह राजपुरोहित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे प्रमुख विधी सल्लागार अॅड. राजेश आगळे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीचे अधिकृत पत्र त्यांना प्रदान करण्यात आले.
अॅड. राजेश राजपुरोहित यांनी आपल्या वकिली कारकिर्दीत विविध स्वरूपाची तसेच महत्त्वपूर्ण आणि हाय-प्रोफाईल प्रकरणे हाताळली आहेत. न्यायालयीन कामकाजातील अनुभव आणि विविध प्रकरणांमध्ये प्रभावीपणे बाजू मांडण्याच्या कौशल्यामुळे त्यांनी विधी क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विधी क्षेत्रासोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचे योगदान राहिले आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा (लीगल सेल), पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या माध्यमातून त्यांनी कायदेविषयक विषयांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
महानगरपालिकेच्या वकील पॅनेलवरील नियुक्तीनंतर अॅड. राजपुरोहित यांच्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी संबंधित विविध कायदेशीर आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा महानगरपालिकेच्या कायदेशीर बाबींमध्ये उपयोग होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या नियुक्तीबद्दल विधी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार तसेच हितचिंतकांकडून अॅड. राजेश राजपुरोहित यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील कायदेविषयक वाटचालीसाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या जात आहेत.


