अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करू : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

बालकांच्या पालकांना ५ लाखांचा धनादेश प्रदान

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी)  : जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. येथील अतिदक्षता विभाग गरजूंसाठी महत्त्वाचा असल्याने अत्याधुनिक आणि सुसज्ज अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मुरके हॉस्पिटल तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, रवी राणा, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते. आपत्कालीन परिस्थितीत नवजात बालकांचे जीव वाचविणे ही प्रशासनाची प्राथमिकता होती. एकूण ३६ बालकांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. यशस्वी उपचारानंतर सर्व बालकांची प्रकृती आता ठीक आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी त्याच दिवशी भेट देत चौकशी समितीची घोषणा केली आहे. आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

येत्या काळात अतिदक्षता कक्ष एम्सच्या मानकानुसार तयार करण्यात येणार असून, येथे जागतिक दर्जाची उपकरणे बसविण्यात येतील. यामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पाच लाख रुपयांची मदत स्वप्नील बोरंगे, प्रफुल्ल चोपडे आणि गंगाराम बेठेकर या बालकांच्या पालकांना पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली. तसेच बालकांवर मोफत उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांचे त्यांनी आभार मानले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…