आंतरशालेय इंग्रजी निबंध स्पर्धेत सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश

ऋतुजा खंडारे व पवनी गडपेले यांनी पटकावले प्रथम क्रमांक

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत कै. पी. आर. जोशी स्मृती आंतरशालेय इंग्रजी निबंध लेखन स्पर्धेत दोन प्रथम क्रमांक पटकावले.

हडस हायस्कूल (इंग्रजी माध्यम), नागपूर येथे ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शहरातील १८ शाळांनी सहभाग घेतला होता. इयत्ता आठवीच्या गटात कु. ऋतुजा खंडारे हिने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच इयत्ता नववीच्या गटात कु. पवनी गडपेले हिने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात दोन्ही विद्यार्थिनींना पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाने तसेच मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश, उपमुख्याध्यापिका  शैली अय्यर, पर्यवेक्षक राहुल घोडे आणि  शैलेंद्र ठाकूर यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून अभिनंदन केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…