व्यापाऱ्यावरील हल्ल्याप्रकरणी सिंधी समाजबांधव आक्रमक

हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

परभणी,निलेश कामतीकर ( जिल्हा प्रमुख ) :  वसमत रस्त्यावरील विजय वाईनशॉपचे संचालक किशोर तलरेजा यांच्यावर रविवारी (दि. ३०) काही हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त सिंधी समाजबांधवांनी केली. यासंदर्भात सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना निवेदन साद करण्यात आले.

सिंधी समाजबांधवांनी पोलिस अधीक्षक कुमावत यांची भेट घेऊन रविवारी रात्री घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. दारू मोफत न दिल्याच्या कारणावरून काही जणांनी तलरेजा यांच्याशी हुज्जत घालत वाद घातल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर तलरेजा यांनी दुकान बंद करून बाहेर पडल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाची चावी हिसकावून घेतली. तलरेजा पायी जात असताना त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख रक्कम हिसकावून घेतल्याचा आरोपही करण्यात आला.

हल्ल्यात तलरेजा यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांच्या डोक्याला सात टाके पडले असून उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. तसेच मान व पाठीवरही गंभीर मार लागल्याचे समाजबांधवांनी पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…