पुण्याची ‘MH 12’ मालिका संपली; आता ‘MH 61’ नवी ओळख

पसंतीच्या क्रमांकांसाठी ११०० हून अधिक अर्ज; VIP नंबरसाठी पुणेकरांची चढाओढ

पुणे , प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  पुणे शहराची ओळख असलेली ‘MH 12’ ही वाहन क्रमांकाची मालिका आता संपली असून, यापुढे पुण्याची नवी ओळख ‘MH 61’ ही असणार आहे. नवीन मालिकेचे पुणेकरांकडून उत्स्फूर्त स्वागत होत असून, पसंतीच्या (चॉईस) क्रमांकांसाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) आतापर्यंत ११०० हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. ही नवीन मालिका उद्या किंवा सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

नवीन मालिकेबाबत उत्सुकता

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीतील ‘MH 12’ ही मालिका दोन दिवसांपूर्वी पूर्ण झाली. त्यानंतर पुण्यासाठी कोणती नवीन मालिका सुरू होणार, याबाबत वाहनधारकांमध्ये उत्सुकता होती. महाराष्ट्रात आतापर्यंत १ ते ६० पर्यंतचे आरटीओ कोड विविध जिल्हे आणि उपविभागांना देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील उपलब्ध असलेला ‘MH 61’ हा क्रमांक पुणे शहराला देण्यात आला आहे.

पुणे आरटीओचे अधिकारी विनायक व्ही. साखरे यांनी सांगितले की, चारचाकी वाहनांसाठी ‘MH 61 A’, तर दुचाकी वाहनांसाठी ‘MH 61 B’ ही मालिका सुरू करण्यात येणार आहे. उद्या किंवा सोमवारपासून या मालिकेतील वाहन नोंदणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवीन मालिकेतील आकर्षक आणि पसंतीच्या क्रमांकांसाठी वाहनधारकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत ११०० हून अधिक अर्ज दाखल झाले असून, VIP आणि पसंतीच्या क्रमांकांसाठी वाहनधारकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…