पिंपरी-चिंचवड भाजपची कोअर कमिटी जाहीर

शत्रुघ्न काटे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; अनुभवी नेत्यांचा समावेश

पिंपरी-चिंचवड, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ): भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली ही नवी कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली.

नव्या कोअर कमिटीमध्ये जिल्हाध्यक्षपदी शत्रुघ्न काटे, तर जिल्हा प्रभारीपदी भरत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीसपदी मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्छे, विकास डोळस आणि वैशाली खाडये यांचा समावेश करण्यात आला आहे. खासदार-आमदार गटात महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे आणि अमित गोरखे यांचा समावेश आहे. महापौर-जिल्हा परिषद अध्यक्ष गटात रवी लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नेते म्हणून अमर साबळे आणि अश्विनी जगताप, तर माजी जिल्हाध्यक्ष म्हणून सदाशिव खाडे यांचा कोअर कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. नव्या नेतृत्वामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत भाजपचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…