दिवंगत दिनेश शेराम यांच्या स्मृती जपण्यासाठी ‘विचारमंच’ स्थापन करण्याचा निर्धार

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : आदिवासी समाजाच्या संघटनात्मक बांधणीसह सामाजिक, शैक्षणिक आणि समाजहिताच्या कार्यासाठी आयुष्यभर झटणारे विदर्भ आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ महासचिव, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त दिवंगत दिनेश अंबादास शेराम यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, विदर्भ विभाग शाखा नागपूरच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

गांधी विचारधारा सभागृह, गांधीनगर येथे रविवारी आयोजित श्रद्धांजली सभेत दिवंगत दिनेश शेराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि आदिवासी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत उईके होते. प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन पंधरे, शरद आडे (वर्धा), प्रा. वामन शेडमाके (भंडारा), माजी नगरसेवक मुकुंदा उईके, अंजना मडावी, डॉ. सचिन उईके, शुभांगी शेराम, शेषनारायण सलामे, सुधीर आंडे, विजय परतीके, स्वप्नील मसराम, राहुल मडावी, श्याम कोडापे, नैना कोडापे, कविता जुमनाके, नितीन इवनाते, प्रमोद उईके, शंभू गोंड कोहचाडे, गजानन कुंभरे, रोहित वलके, कबीरलाल किलनाक, गणेश करणाके, अजय शिंग्रे, निकेश परतेकी, राम कोडापे, निलेश उईके आदी मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते. श्रद्धांजली सभेत राहुल मेश्राम यांनी दिनेश शेराम यांच्या विचारांना आणि सामाजिक कार्याला पुढे नेण्यासाठी ‘स्व. दिनेशभाऊ शेराम विचारमंच’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. या विचारमंचाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक तसेच सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम राबविण्यात यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या प्रस्तावाला उपस्थित समाजबांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वानुमते सहमती दर्शविली. दिनेश शेराम यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिनेश शेराम यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचा मनमिळावू स्वभाव, निष्ठावान कार्यपद्धती, समाजासाठी असलेली तळमळ आणि आदिवासी समाजाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.आदिवासी समाजातील विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे आणि समाजाच्या विकासासाठी कार्यरत राहणारे समर्पित नेतृत्व म्हणून दिवंगत दिनेश शेराम यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन राहुल मसराम यांनी केले. भावपूर्ण वातावरणात झालेल्या या श्रद्धांजली सभेत दिनेश शेराम यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या सामाजिक विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…