राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांना अभिवादन

बालेवाडी : हॉकीचे जादूगार आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळावी तसेच क्रीडा क्षेत्रातील योगदानाची जाणीव नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

यावेळी प्रकाश (तात्या) बालवडकर सपोर्ट फाउंडेशन, बालेवाडी यांच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट क्रीडा कारकिर्दीचा तसेच देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या असामान्य हॉकी कौशल्याने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उंचावले. त्यांच्या जीवनातून आणि कर्तृत्वातून आजच्या युवा खेळाडूंनी प्रेरणा घेऊन विविध क्रीडा प्रकारांत देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी अशीच उंचावत राहावी आणि देशाला नवनवीन क्रीडा प्रतिभा लाभावी, अशा शुभेच्छा प्रकाश (तात्या) बालवडकर सपोर्ट फाउंडेशनच्या वतीने देण्यात आल्या.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…