स्नेह सदन विशेष शाळेत प्रबोधनकार महिला महाविद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन साजरा

दिव्यांगांविषयी जनजागृतीचा संदेश

रामटेक, प्रशांत भोयर (प्रतिनिधी) : येथील स्नेह सदन मतिमंद मुला-मुलींची विशेष अनिवासी शाळा येथे प्रबोधनकार महिला महाविद्यालय, रामटेक यांच्या वतीने एका आगळ्यावेगळ्या आणि भावूक वातावरणात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. समाज आणि दिव्यांग मुलांमधील दरी मिटवून त्यांच्यात आपुलकीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या संयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेह सदन शाळेचे मुख्याध्यापक पंकज पांडे उपस्थित होते. तर प्रबोधनकार महिला महाविद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ शिक्षिका व प्राध्यापिका प्रामुख्याने उपस्थित होत्या.

विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या बांधल्या

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रबोधनकार महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आकर्षक राख्या दिव्यांग मुलांना बांधल्या. विद्यार्थिनींनी दाखवलेल्या प्रेम आणि जिव्हाळ्यामुळे दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला. राखी बांधल्यानंतर मुलांनीही आपल्या मोठ्या बहिणींचे आभार मानले.

प्रेग्नन्सीमधील काळजी आणि जेनेटिक काउन्सिलिंगवर मार्गदर्शन

कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक पंकज पांडे यांनी समाजातील महिलांनी दिव्यांगांविषयी संवेदनशील होऊन जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. दिव्यांगत्व रोखण्यासाठी आणि निरोगी पिढीसाठी त्यांनी महिलांना महत्त्वाचे वैद्यकीय मार्गदर्शन केले. लग्न किंवा अपत्यप्राप्तीपूर्वी ‘जेनेटिक काउन्सिलिंग’ (अनुवांशिक सल्लामसलत) करण्याचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. तसेच गर्भावस्थेत महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून घेणे आणि या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य वेळी घेतलेली काळजी भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यास मदत करू शकते, असा सल्लाही त्यांनी दिला.

या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल दोन्ही संस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे दिव्यांग मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला दोन्ही संस्थांमधील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…