प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत रक्षाबंधन; जगदीश मुळीक फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

पुणे, आशिष औंढेकर ( प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र ) :  बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा धागा अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन सण यंदा प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत साजरा करण्यात आला. जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथे रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

समाजातील प्रत्येक घटकाला सण-उत्सवाच्या आनंदात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने रुग्णांसोबत आनंदाचे क्षण घालवत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधणे, तसेच त्यांच्याप्रती स्नेह आणि माणुसकीची भावना व्यक्त करणे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही रुग्णांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, नगरसेवक तथा पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, उद्योजक सुधीर मेहता, कृष्णकुमार गोयल, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोल्हाड, बांधकाम व्यावसायिक संदीप सातव, नगरसेविका कविता गलांडे, सुभाष चव्हाण, रमेश गव्हाणे, प्रताप मोहिते, राहुल जाधव, सुधीर वाघमोडे, महेंद्र गलांडे, संतोष राजगुरू, धनंजय जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…