पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य ; दुरुस्ती मात्र कासवगतीने

पाऊस थांबूनही प्रशासनाचा वेग मंदावला ; समाविष्ट गावांतील रस्त्यांची अवस्था अधिक बिकट

पुणे : जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पुणे शहरातील रस्त्यांना बसला आहे. अनेक भागांतील रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसरत सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असतानाही खड्डे बुजविण्याच्या कामाला अपेक्षित वेग आलेला दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडत आहे.

महापालिकेच्या पथ विभागाकडून दरवर्षीप्रमाणे रस्त्यांची डागडुजी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासोबतच पावसाळी वाहिन्या आणि चेंबरची साफसफाईही करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात पावसानंतर शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था पाहता ही कामे अपुरी ठरत असल्याचे चित्र आहे. मध्यवर्ती भागाच्या तुलनेत उपनगरांमधील रस्त्यांची अवस्था अधिक खराब झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होत असून वाहतूक कोंडीची समस्याही वाढत आहे. दुचाकीस्वारांसाठी हे खड्डे विशेष धोकादायक ठरत आहेत. यापूर्वी खड्ड्यांमुळे शहरात दोघांचा जीव गेल्याच्या घटना घडूनही प्रशासनाच्या कामाच्या गतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

समाविष्ट गावांचा प्रश्न कायम

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील रस्त्यांची अवस्था तर आणखी चिंताजनक आहे. महापालिकेत समावेश झाल्यानंतर आपल्या भागाचाही शहराप्रमाणे विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र, अनेक वर्षे उलटूनही मूलभूत सुविधांच्या बाबतीत या भागांना अजूनही संघर्ष करावा लागत आहे. विकास आराखड्याचा प्रश्न रखडलेला असताना गावांतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येणेही कठीण होते. परिणामी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसाने काही काळ विश्रांती घेतली असताना महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग देण्याची गरज आहे. अन्यथा यंदाच्या पावसाळ्यातील रस्त्यांची समस्या नागरिकांसाठी केवळ गैरसोयीची न राहता गंभीर सुरक्षेचा प्रश्न ठरू शकते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…