म्हाडाची ‘न विकलेली घरे’ ठरणार कमाईचे साधन; सीआयएसएफला भाडेतत्त्वावर देणार १,१०० घरे

वर्षाला मिळणार १३.५६ कोटींचे उत्पन्न; शिरढोण प्रकल्पातील घरांचा होणार वापर

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळासाठी मोठी आर्थिक संधी निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील शिरढोण येथील विक्री न झालेली घरे आता धूळखात पडून राहणार नसून ती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे म्हाडाला दरवर्षी तब्बल १३ कोटी ५६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

पीएम आवास योजनेअंतर्गत शिरढोण येथे म्हाडाचा १८ हजारांहून अधिक घरांचा मोठा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी बांधण्यात आलेल्या घरांपैकी काही घरे अद्याप विक्रीविना शिल्लक आहेत. ही घरे सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१,१०० घरांचा होणार वापर

म्हाडाकडून सीआयएसएफला एकूण १,१०० घरे भाडेतत्त्वावर दिली जाणार आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील ६०० घरे आणि अल्प उत्पन्न गटातील ५०० घरांचा समावेश आहे. या घरांचे क्षेत्रफळ सुमारे ३१० ते ४५० चौरस फुटांपर्यंत आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील घरासाठी दरमहा ८ हजार रुपये, तर अल्प उत्पन्न गटातील घरासाठी १३ हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. याबाबत म्हाडा आणि सीआयएसएफमध्ये लवकरच करार होणार आहे.

म्हाडाला मिळणार अतिरिक्त महसूल

सीआयएसएफकडून दोन महिन्यांच्या भाड्याइतकी रक्कम डिपॉझिट म्हणून घेतली जाणार असून, त्यातून म्हाडाला सुमारे सव्वादोन कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच दरवर्षी मूळ भाड्यावर ५ टक्के वाढ करण्यात येणार आहे.विक्री न झालेली घरे रिकामी ठेवण्याऐवजी त्यांचा वापर करून म्हाडाने उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. या निर्णयामुळे घरांचा उपयोगही होणार असून म्हाडाच्या महसुलातही वाढ होणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…