मुंबईकरांना मोठा झटका! CSMT-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद?

सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामामुळे हार्बर मार्गावरील सेवेत मोठा बदल होण्याची शक्यता

मुंबई :  मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते गोरेगाव लोकल सेवा तब्बल ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता असून, यामुळे लाखो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. मात्र, याबाबत रेल्वे प्रशासनाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमयूटीपी-२) प्रकल्पांतर्गत मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहावी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. या कामासाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बाधणी आवश्यक असल्याने रेल्वे प्रशासन ४५ दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. हा ब्लॉक लागू झाल्यास हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल केवळ वांद्रेपर्यंतच धावतील, तर गोरेगावपर्यंतची सेवा तात्पुरती बंद राहू शकते.

दरम्यान, वांद्रे स्थानकात नवीन फलाट उभारण्याचाही प्रस्ताव असून, त्यामुळे भविष्यात अधिक लोकल फेऱ्या चालवणे शक्य होणार आहे. सहाव्या मार्गिकेच्या मुख्य कामासाठी निविदा प्रक्रिया ऑगस्ट २०२६मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नसला, तरी या संभाव्य बदलामुळे दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांचे लक्ष आता अधिकृत घोषणेकडे लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

महाराष्ट्र में बारिश का कहर! 24 घंटे भारी, कई जिलों में अलर्ट जारी

पुणे :  राज्य में एक बार फिर बारिश ने रफ्तार पकड़ ली है। कई जिलों में लगातार हो रही भारी बारिश के कारण जनजीवन प्रभावित हुआ है। कहीं नदी-नाले उफान…

४४ वर्षांनंतर सहस्त्रकुंडला भगवान परशुराम मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि धार्मिक महत्त्व असलेल्या सहस्त्रकुंड येथे तब्बल ४४ वर्षांनंतर भगवान परशुराम यांच्या मूर्तीची विधिवत पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर आणि…