RBSKचा दिलासा! नांदेडमधील १७ चिमुकल्यांना मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी ठाण्याला रवाना

विशेष तपासणी शिबिरात १०९ बालकांची 2D इको तपासणी; जन्मजात हृदयविकार असलेल्या १७ बालकांवर कीम्स हॉस्पिटलमध्ये होणार मोफत उपचार

नांदेड :  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त १७ चिमुकल्यांना नवजीवनाची संधी मिळाली आहे. जिल्हा रुग्णालयात आयोजित विशेष हृदयरोग तपासणी शिबिरात १०९ बालकांची 2D इको तपासणी करण्यात आली. यामध्ये शस्त्रक्रियेची गरज असलेल्या १७ बालकांची निवड करण्यात आली असून, त्यांना ठाणे येथील कीम्स हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी तपोवन एक्सप्रेसने रवाना करण्यात आले.

बालकांमधील जन्मजात व्यंग, कुपोषण, विकासातील अडचणी आणि विविध आजारांचे वेळेत निदान करून उपचार मिळावेत, या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात ४५ आरोग्य पथकांमार्फत वर्षातून दोन वेळा अंगणवाडीतील आणि एकदा शाळेतील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. या कार्यक्रमांतर्गत हृदयरोग, नेत्रविकार, आकडी (फेफरे) यांसारख्या गंभीर आजारांसाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. पात्र बालकांना आवश्यक औषधोपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच कुपोषित बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करून उपचारासह पालकांना बुडीत मजुरीचा लाभही दिला जातो. जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) मार्फत विकासातील अडचणी असलेल्या बालकांवर वेळेत उपचार करून भविष्यातील गुंतागुंत टाळण्यावर भर दिला जातो.

या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आणि उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर डॉ. रेखा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे आणि डॉ. अविनाश दहिफळे यांच्या नेतृत्वाखाली शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. मोफत हृदय शस्त्रक्रियेची संधी मिळाल्याने संबंधित बालकांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले. वेळेत निदान आणि मोफत उपचारामुळे अनेक चिमुकल्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

खडकवासला धरणसाखळी तुडुंब! पुण्याच्या पाणीटंचाईची चिंता संपली

पुणे :  पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २६.६६ टीएमसी म्हणजेच ९१.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची तसेच…

मुंबई लोकल फिर हुई लेट! रेलवे ने यात्रियों को बताया वजह, रोजाना सफर करने वालों में बढ़ा गुस्सा

मुंबई :  मुंबई की लाइफलाइन कही जाने वाली लोकल ट्रेन एक बार फिर चर्चा में है। लगातार देरी से चल रही डहाणू-चर्चगेट (93002) लोकल से परेशान यात्रियों का सब्र अब…