खिचडीसोबत आता व्हेज पुलावही! अंगणवाडीच्या आहारात मोठा बदल; बालकांना मिळणार अधिक पौष्टिक मेन्यू

महिला व बालविकास विभागाचा निर्णय; नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ पासून सुधारित पोषण आहार, बहुधान्य पफ आणि स्वतंत्र मसाला पाकीटही मिळणार

 महाराष्ट्र :  अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात राज्य सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. घरपोच पोषण आहार योजनेअंतर्गत आता पारंपरिक खिचडीसोबत व्हेज पुलाव, बहुधान्य पौष्टिक पफ आणि स्वतंत्र मसाला पाकीट देण्यात येणार आहे. सुधारित आहाराचा पुरवठा नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ पासून सुरू होणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे.

लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, चविष्ट आणि रुचकर आहार मिळावा, तसेच बालके आणि मातांनी हा आहार आवडीने स्वीकारावा, या उद्देशाने खाद्यसूचीत बदल करण्यात आला आहे. सुधारित नियोजनानुसार पौष्टिक मूगडाळ खिचडी प्रीमिक्स पूर्वीप्रमाणेच उपलब्ध राहणार असून, त्यासोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिले जाईल. मात्र, तूरडाळ खिचडी प्रीमिक्सच्या जागी आता व्हेज पुलाव दिला जाणार आहे. तसेच भरडधान्ययुक्त बहुधान्य-प्रथिन मिश्रणाऐवजी बहुधान्य पौष्टिक पफ (मल्टीग्रेन न्यूट्री पफ) लाभार्थ्यांना मिळणार आहे. बहुधान्य-प्रथिन मिश्रणाचा समावेश मात्र कायम ठेवण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ४ हजार ३९५ अंगणवाड्या कार्यरत असून, या कें द्रांमार्फत सुमारे १ लाख ६ हजार बालके, तसेच गरोदर महिला आणि स्तनदा मातांना घरपोच पोषण आहाराचा लाभ दिला जातो. नवीन खाद्यसूचीचा लाभ या सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे. महिला व बालविकास समितीच्या सभापती अंकिता पाटील यांनी सांगितले की, सुधारित आहारामुळे लाभार्थ्यांना अधिक दर्जेदार, पौष्टिक आणि चविष्ट अन्न मिळेल. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये नव्या खाद्यसूचीनुसार पुरवठा सुनिश्चित करण्यात येणार आहे.नवीन मेन्यूमुळे बालकांच्या पोषणात भर पडण्यासोबतच गरोदर महिला आणि स्तनदा मातांनाही अधिक संतुलित व सकस आहार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

खडकवासला धरणसाखळी तुडुंब! पुण्याच्या पाणीटंचाईची चिंता संपली

पुणे :  पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २६.६६ टीएमसी म्हणजेच ९१.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची तसेच…

मुंबई लोकल फिर हुई लेट! रेलवे ने यात्रियों को बताया वजह, रोजाना सफर करने वालों में बढ़ा गुस्सा

मुंबई :  मुंबई की लाइफलाइन कही जाने वाली लोकल ट्रेन एक बार फिर चर्चा में है। लगातार देरी से चल रही डहाणू-चर्चगेट (93002) लोकल से परेशान यात्रियों का सब्र अब…